सत्याग्रह

एक तरी ओवी अनुभवावी - भालचंद्र कुलकर्णी

॥ श्री ॥

एक तरी ओवेवी अनुभुभवावी.....

श्री संत ज्ञानेश्‍वर

खरं तर आयुष्य खुप लहान आहे आणि ‘अनुभव’ हाच गुरू असल्याने त्याला

महत्त्व दिल्यास संत ज्ञानेश्‍वरांनी सांगतिल्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी.

आयुष्यात जन्माला आल्यावर माणूस कोठून आला? काय करतो आणि कुठे

जाणार हे परमेश्‍वराशिवाय कोणालाच सांगता येणार नाही.

आम्ही शाळेतून नुकतेच मिसुरडे फुटलेली कोवळी मुले जेंव्हा देशाचा विचार

आम्ही सत्याग्रही -  श्री पांडुरंग गवई 

देशांमध्ये १९७५ साली आणिबाणीचे प्रवास सुरू झाला त्यास आता त्रेचाळीस वर्षे झाली .त्या वेळच्या पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनेची पायमल्ली केली लोकशाहीतील स्वातंत्र्याची गळचेपी केली भाषण स्वातंत्र्य ,लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील चौथा समास समजला जातो त्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा घाला घातला. आणीबाणी देशात लागू केली।

श्रीराम कुलकर्णी यांचे अनुभव

आणीबाणीच्या आठवणी अनेक कारणांमुळे बरेचदा येत असतात अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे जेवणाचे वेळी कोणी मुले जेवताना सोबत असली आणि कोणी म्हणाले की मला ही भाजी आवडत नाही मी चेष्टेने म्हणतो तुम्हाला 52 पतीची भाजी खायला तरी कंपल्सरी जेलमध्ये ठेवले पाहिजे जाने की भाजी भाजी त्याला जगात कुठेही जगणे अवघड नाही जिभेचे चोचले बंद गोष्ट निघाली म्हणून सांगायचे आत्ताच एक गंमत सांगून टाकतो जेलमधून बाहेर पडताना जेल चे कपडे उतरवून आमचे कपडे परत दिले तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये दोघे असे होते की जो गोलमटोल होता तो इतका बारीक झाला की त्याची पॅंट कमरेवर न राहता खाली गळून पडली, तर एकाला

आणीबाणी आणि आठवणी - हेमंत कुलकर्णी

नांव: हेमंत दामोदर तथा बाळ कुलकर्णी

पत्ता: ४९५, नारायण पेठ, पत्र्या मारुती जवळ, पुणे-४११०३०

व्यवसाय: बांधकाम

सत्याग्रहाविषयी : दिनांक १९ नोव्हेंबर १९७५.

                        संघाची पहिली बॅच.

                        बॅच लीडर म्हणून जबाबदारी.

स्थान:.              आपला बळवंत चौक.

सहभागी:. जयंत म्हाळगी, चर्होलीकर ज़ोशीबुवा, रवी कुलकर्णी, दादा गोळे, निळू जोशी, रवी जोशी.

आणिबाणी आठवणी-४ - सुनील दळवी

येरवडा जेलमध्ये मिसा बंदी एका वॉर्डमध्ये होते आणि सत्याग्रही एका वॉर्ड मध्ये होते. आमच्या वॉर्डमध्ये सत्याग्रहींशिवाय इतर कोणी कैदी  नव्हते, त्यामुळे तुरुंगात आलो आहोत असे वाटतच नव्हते. नाही म्हणायला शिपाई आणि इतर कैदी यांची ये-जा चालायची त्यामुळे तुरुंगात असल्याची जाणीव व्हायची. आमच्या आधी काही जण सत्याग्रह करून आले होते. त्यात सुरेश नाशिककर होते. दोन चार दिवसांत गिरीष बापट आले. तिथे दिवसाचा कार्यक्रम सेट झाला होता. दुपारी मिसाबंदींपैकी कोणाचा तरी बौद्धिक वर्ग/व्याख्यान होत असे. त्यामध्ये समाज वादी  मंडळी सुद्धा असत. एकंदरीत सर्वांचा टेंपो टिकुन होता. 

आणिबाणी आठवणी-३ -सुनील दळवी 

दसरा झाला, दिवाळी झाली. दिवस जात होते. माझे कॉलेज पण सुरू होते. नोव्हेंबर मध्ये सेमिस्टर परिक्षा होती. त्यामुळे अभ्यासात लक्ष होते. अधुनमधुन बैठकी पण होत होत्या. होता होता आणिबाणी विरोधी लढ्याची योजना पण तयार झाली. आणिबाणी मध्ये घटना धाब्यावर बसवुन लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी केली म्हणून लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे ठरले. त्याकरता अखिल  भारतीय स्तरावर लोक संघर्ष समिती स्थापन केली. आणि त्या माध्यमातून लढा देण्याचे ठरले. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बुलेटिन काढायला सुरुवात झाली. ही बुलेटिन्स छापण आणि वितरीत करण हे फारच धोकादायक होते.

आणिबाणि आठवणी-२ -सुनील दळवी 

हळुहळू आणिबाणी चा परिणाम जाणवु लागला. लोकांमधे भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले. जनता एका अनामिक दडपणाखाली होती. अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीचा डंका पिटण चालू झाले. पण वास्तवात सरकारी दहशतीचा वरवंटा फिरत होता. काही बोलायची चोरी होती. माझ्या पत्नीचे माहेर कर्नाटकातले. तिच्या आईचे नाव इंदिरा होते. तर त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या इतर बायका तिला इंदिरा या नावाने हाक मारायला सुद्धा घाबरत होत्या. इतकी जबरदस्त भिती पसरली होती. 

मंतरलेले दिवस -डॉ. अनिल प्रभाकर कुलकर्णी, पुणे.

२५ जूनला आणीबाणी जाहीर झाली व नंतर अभाविप  कार्यकऱत्यांनी सत्याग्रहाची योजना आखली. एकाच वेळेस १०  कॉलेजवर १०० कार्यकर्त्यानी सत्याग्रह करावा अशी योजना केली. त्यात गरवारे  कॉलेजवर माझ्या बरोबर ७ जण सत्याग्रहात सामील झाले. ११ डिसेंबर १९७५ रोजी आम्हाला अटक करून येरवडा जेलमध्ये नेण्यात आले. एकाच दिवशी १० कॉलेजवर सुमारे १०० जण सत्याग्रह करून जेलमध्ये आले. तिथे आधीच २०० जण होते. आम्ही आत गेल्यावर त्यांना खूपच उत्साह आला. मिसामधील नेत्याना आनंद झाला. मग काय आमचे ३०० जणांचे शिबिरच जेलमध्ये सुरु झाले.

रोकडे राजेंद्र विश्वनाथ

  • नाव : रोकडे राजेंद्र विश्वनाथ.(Rokade Rajendra Vishwanath)
  • शहर : पुणे.
  • राज्य : महाराष्ट्र.
  • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
  • सत्याग्रहाची तारीख : ८ जानेवारी, १९७६.
  • जबाबदारी : सत्याग्रही सहभागी.
  • स्फूर्तीस्थान : चंद्रगुप्त सायम शाखा. (संघस्थान गुरुवार पेठ, पुणे)

Pages