रक्षण

लोकशाही रक्षणासाठी सत्याग्रह

पुढारीपणाचे फायदे व तोटे या दोन्ही गोष्टींचा अनुभव अलीकडे मला येत आहे. संघात जयजयकार कधी फारसा होत नाही. व्यक्तिशः आपण करूही देत नाही; परंतु सध्या सत्कार, स्वागत समारोह चालू आहेत. गळ्यात हार पडत आहेत. भाषणांतून, लेखांमधून प्रशंसा होत आहे. ‘हे सारे बरे आहे’ असे वाटत नाही, असे काही म्हणावयाचे कारण नाही. परंतु पुढारीपणाचा दुसराही अनुभव आहे. पुढारी पुढे असतो आणि लोक मागे असतात. मागे असलेले लोक त्या पुढार्‍याला असे काही पुढे ढकलत असतात की त्याला मागे फिरणे किंवा इकडे तिकडे वळणे याची शक्यता फारशी नसते.