सौभाग्यवतींचा हातभार

पुणे जिल्हा कार्यवाह - प्रत्यक्ष अटक 21डिसेंबर 1975 ला झाली. तत्पूर्वी भूमिगत म्हणून कार्य केले. त्या वेळचा एक अनुभव. भूमिगत असताना लोणावळे येथे घरच्या मंडंळींना (पत्नी व 2 मुले) भेटीस बोलाविले. पोलिसांना मागोवा लागला. हे ओळखून इनामदार राजमाची पॉईंटकडे गेले. तेथेही पोलिसांचा पाठलाग. वेळ रात्रीची. पाऊस संततधार. रात्री एकदम दिवे गेले. पोलीस मागावर आहेत, हे ओळखताच बोरिवली गाडीने घरच्या मंडळींना तेथेच ठेवून पसार. जागोजागी पेटलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंग ओळखून दुसर्‍याकडून टॅक्सी मागविली व घरच्या मंडळींना योग्य स्थळी पोहोचवले. या रोमहर्षक व स्फूर्तिप्रद कार्यक्रमात सर्व कुटुंब सामील. मुलगा 12 वर्षांचा व मुलगी 7 वर्षांची. एवढ्या लहान वयात मिळालेला साहसाचा अनुभव मोठा रोमहर्षक असा ठरला.

शाळेतील अनुभव

तात्पुरती रजा संपवून किसनराव शनिवारी दुपारी गेले. मस्टरवर सही केली. पोलीस शाळेत चौकशीला येऊन गेल्याचे कळले. त्यामध्ये केवळ 15 मिनिटांचा योगायोगाने फरक पडला. लगेच 2 महिन्यांचा दीर्घ रजेचा अर्ज टाकला व तेथून पसार झाले. पुढील संकट टळले. त्यानंतर पुतण्याच्या लग्नाहून परतले असता रात्र झाली होती. गल्लीच्या तोंडावर ते आले, तेव्हा पोलिसांची व्हॅन वळलेली दिसली. त्यांची रिक्शा थोडा वेळ वाटेत थांबली. त्या वेळी शेजारच्या एका मुलाने... कार्यकर्त्याने ताबडतोब आल्या पावली परत जाण्याचा सल्ला दिला. रिक्शा तशीच परतवली व सुरक्षित जागी सर्व कुटुंबीयांना सोडले. स्वत: तेथेच एक आठवडा राहिले. भूमिगत राहून योग्य ती कार्याची जुळणी केली व परगावी गेले. कुटुंबास महिनाभर असे अज्ञातवासात ठेवण्यात आले. मुलाला व मुलीला हा आलेला अनुभव कौतुकास्पद होता. या कामात सौभाग्यवतींचा हातभार मोठा होता.

- किसनराव इनामदार