श्री. गुजर विद्यासागर रमणलाल

 श्री. गुजर विद्यासागर रमणलाल
 • नाव : श्री. गुजर विद्यासागर रमणलाल.(Mr. Gujar Vidyasagar Ramanlal)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • जन्मतारीख : ५ ऑक्टोबर १९५७.
 • सत्याग्रहाची तारीख : ११ डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : सत्याग्रही / पत्रक वाटप.
 • स्फूर्तीस्थान : पुणे कसबा पेठ.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : पत्रके वाटपाचे कामकाज चालू होते. तसेच महादजी शाखेचा स्वयंसेवक होतो. वडीलही स्वातंत्र्यसैनिक होते (दादरा नगर हवेली मुक्तीसंग्राम समिती) त्यांचे प्रेरणेने सत्याग्रहात सहभाग घेतला. दि. ११ डिसेंबर १९७५ रोजी ११ स्वयंसेवकांनी एकत्र येऊन दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर रस्ता अडवून तसेच आणीबाणी विरुद्ध घोषणा देत सत्याग्रह केला.
 • कारागृह : येरवडा व विसापूर.
 • कालावधी : दीड महिना (२४ जानेवारी १९७६ पावेतो).
 • स्फूर्तिदायक आठवणी : आम्ही मुख्यत: येरवडा कारागृहात एक दिवस कच्च्या पोळ्या येत असल्याने त्याचे निषेधार्थ एक दिवसाचे उपोषणाचा कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे विसापूर जेलमध्ये मैदानी खेळ खेळलो.