डॉ. नेरलेकर रवींद्र उर्फ दीपक गोविंद

डॉ. नेरलेकर रवींद्र उर्फ दीपक गोविंद
 • नाव : डॉ. नेरलेकर रवींद्र उर्फ दीपक गोविंद.(Dr. Nerlekar Ravindra Govind)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर.
 • सत्याग्रहाची तारीख : ३० डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : सत्याग्रही.
 • स्फूर्तीस्थान : स्व.पं. दीनदयाळजी उपाध्याय.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : ३० डिसेंबर, १९७५ रोजी  श्री. किशोरभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ८ जणांनी पी.एम.टी. बस अडवून तिच्यावर चढून आणीबाणीविरोधी घोषणा दिल्या. सुमारे २०-२५ मिनिटे हा सत्याग्रह घोषणांनी दणाणून गेला होता. चौकांतून येणारी सर्व वाहतूक रोखली गेली होती. लोकांचे लक्ष वेधावे म्हणून भरपूर प्रमाणात फटाके उडविले. नंतर पोलीस अटक करण्यास आल्यानंतर राष्ट्रगीत सुरु केले. उद्देश हा होता की सत्याग्रहाचा अवधी अधिककाळ वाढावा. 
 • कारागृह : येरवडा मध्यवर्ती कारागृह.
 • कालावधी : ३० डिसेंबर, ७५ ते ५ एप्रिल, ७६.
 • आठवणी : अनेक आहेत पण एक आठवण खूप काही शिकवून गेली. रास्ता पेठेत एक बैठक आयोजित केली होती. मा. नानाजीराव ढोबळे बैठकीत वक्ते म्हणून होते. एका स्वयंसेवकाने मा. इंदिराजी गांधी यांचा एकेरी उल्लेख केला. त्या बरोबर मा. नानांनी त्यास थांबवले व गरजले,” थांबा मा. इंदिराजींचा असा एकेरी उल्लेख करू नका. त्या महिला (स्त्री) असून पद, अनुभव ह्यातही जेष्ठ आहेत. व कोणत्याही जेष्ठ स्त्रीला एकेरी संबोधणे आपल्या संस्कृतीत सांगितलेले नाही.