जोशी मोरेश्वर नागनाथ

जोशी मोरेश्वर नागनाथ
 • नाव : जोशी मोरेश्वर नागनाथ.(Mr. Joshi Moreshwar Nagnath)
 • जन्मतारीख : ३० सप्टेंबर, १९४८.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : १८ नोहेंबर, १९७५.
 • जबाबदारी : घोषशाखा कार्यवाहक.
 • स्फूर्तीस्थान : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पु. डॉ. हेडगेवार, प. पु. श्री. गुरुजी.
 • सत्याग्रह : अप्पा बळवंत चौक येथे भाषण करून आणीबाणी विरोधात पत्रके वाटण्यास आरंभ केला. एकूण सातजण होते. पहिलाच सत्याग्रह.  लोक सांगत होते असे करू नका, घरी जा, आयुष्याचे नुकसान होईल. पण  त्यांचे न ऐकता आम्ही तसेच पुढे गेलो. बुधवार चौकात अटक केली. दुसऱ्या दिवशी कोठडीतून येरवडा कारागृहात नेले. १ महिन्याची शिक्षा झाली.
 • कारागृह : येरवडा कारागुहात १ महिना.
 • कालावधी : १ महिना नंतर मिसा (स्थानबद्ध) आठ महिने, नाशिक.
 • स्फूर्तिदायक आठवणी : आणीबाणीत अनेकांचे परिचय झाले. प.पु. सरसंघचालक मा.श्री. बाळासो. देवरस यांचा षष्ठीब्दीपुर्ती समारंभ झाला. घोषणा मिळाल्यानंतर संचलन झाले. कीर्तने केली. १ महिना झाल्यावर नाशिक येथे नेले. नाशिक रोड कारागृह तेथे कीर्तने केली. मा. बाबाराव भिडे, मा.प्रल्हादजी, अत्रे अनेक प्रचारक, ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा सहवास लाभला. बौद्धिक वर्ग स्फूर्तीदायक असत. १९९९ मध्ये शासनाकडून सन्मानपत्र मिळाले.