जोशी अनिल रामचंद्र

जोशी अनिल रामचंद्र
 • नाव : जोशी अनिल रामचंद्र.(Mr. Joshi Anil Ramchandra)
 • जन्मतारीख : २८ डिसेंबर, १९५८.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : anil58joshi@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : ३० ऑक्टोबर, १९७५.
 • जबाबदारी : संघ शिक्षावर्ग (प्रथमवर्ग शिक्षित), पूर्व भागात चंद्रगुप्त शाखा, मुख्य शिक्षक.
 • स्फूर्तीस्थान : संघ शाखा, संघ विचार.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : दि. ३०-१९-१९७५ रोजी सायंकाळी ५ वाजता सोमेश्वर मंदिर येथे जमलो. व आणीबाणी विचार स्वातंत्र्य विरुद्ध बंदी व संघ बंदी बाबत घोषणा देत व फलक दाखवत सत्याग्रह केला आणि अटक झाली. २६ जून १९७५ रोजी आणीबाणी, ४ जुलै १९७५ संघ बंदी, १९७५ मे महिन्याचा संघशिक्षा वर्ग (OTC) झाला. प्रथम वर्ष शिक्षित असल्याने जून महिन्यात श्री शिवराज्याभिषेक कार्यक्रमात संघकार्यासाठी नावनियुक्त्या (जबाबदारी) झाल्या. संघकार्य जोमाने पूर्व भागात वाढवण्यासाठी शाखाविस्तार सुरु झाला. अचानक संघाबंदीमुळे सर्वच कार्याला वेगळे वळण लागले. देशभर संघ कार्यकर्त्यांनी, संघ नियोजित कार्यक्रमानुसार सत्याग्रह करून जेल भरो आंदोलन यशस्वी केले.
 • कारागृह : येरवडा आणिविसापूर कारागृह
 • कालावधी : ३ महिने
 • स्फूर्तिदायक आठवणी  : देशभर संघस्वयंसेवकांनी आणीबाणी विरुद्ध व संघबंदी विरुद्ध उघडपणे सत्याग्रहाचे शस्त्र उपसले. आणि देशभर लाखो स्वयंसेवक रस्त्यावर उतरून सत्याग्रह करत होते. दि ३०-१०-१९७५ रोजी पूर्व भागात सोमेश्वरमंदिर (कापड गंज) या ठिकाणी आम्ही ११ जण सायं. ठीक ५ वाजता जमलो, घोषणा देत व फलक हातात घेऊन व काळे झेंडे फडकावत सत्याग्रह केला. अर्ध्यातासानंतर गणेश पेठ पोलीस चौकातून मोठी पोलीस कुमक आली. व आम्हाला अटक करून चौकीवर नेले. जाब-जबाब, माहिती घेतली आणीबाणीचे महत्व व कायदेशीर गंभीर गुन्हा केल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बजावले. रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवण्यात आले. चार्जशीट भरणे व कलमांचा गुन्हा दाखल झाला. त्यावेळी माझा वय १७ वर्षांचे होते. मला माहिती विचारली गेली, घराची परिस्थिती विचारली गेली, गरीब परिस्थितीमुळे हमी पत्रावर सोडण्याचा आग्रह झाला, पुढील आयुष्यात सरकारी नोकरी मिळणार नाही, विचार कर, असे बजावण्यात आले. पण मला संघ विचाराने मन घट्ट झाल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. येरवडा जेल व विसापूर जेलमधील अनुभव तर असंख्य होते. अनेक घटनांनी भारावलेले वातावरण, संघ विचारांची शिदोरी देणारी बौद्धिक विविध लेख, माहिती वजा बाह्य परिस्थितीबाबत कारागृह बातमी पत्र, देशात आणीबाणी  विरुद्ध व संघबंदी विरुद्ध जनभावना तापतायत लोक पेटून उठतायत अशा अनेक बातम्या आमचे मनोबळ वाढवत होत्या. संघाबंदीत देखील कारागृहात नित्य प्रात:स्मरण नित्याचा कार्यक्रम असल्यामुळेच १९७५ पासून आजतागायत मला स्नानविधीनंतर प्रात:स्मरण व श्रीमद्भगवद्गीता पंधरावा अध्याय म्हणण्याची सवय जडली आहे. संस्कार व संघकार्य एकाच नाण्याचे दोन भाग आहेत. संघबंदी नंतरच संपूर्ण भारतात परिवर्तांची लाट निर्माण होऊन, आजच्या समृद्ध भारताचा शिळान्यास झाला.