कु. फडके अमला बळवंत

 • नाव : कु. फडके अमला बळवंत.(Fadake Amla Balwant)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.
 • सत्याग्रहाची तारीख : ११ डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : कार्यकर्ती.
 • स्फूर्तीस्थान : आई-वडील.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये आम्ही १० जणांच्या बॅचने (६ मुले, ४ मुली) सत्याग्रह केला. कॉलेजमध्ये एक प्रदर्शन होते, त्याची पोस्टर्स कँटीन, कॉरिडॉर, दरवाज्यापाशी, पार्किंगमध्ये लागली होती.  त्याच्या आतमध्ये आणीबाणीची माहिती पत्रके चिकटवली होती. मधल्या सुट्टीमध्ये वरील प्रदर्शनाची पत्रके फाडली व आणीबाणीची पत्रके उधळून, घोषणा देऊन विद्यार्थ्यांना गोळा करून आणीबाणी विरुद्ध भाषणे केली. ११ कॉलेजवर एकदम सत्याग्रह केल्याने पोलीस येण्यास एक तास लागला. तोपर्यंत सर्व कॉलेज, लायब्ररी, कँटीन येथे फिरून पत्रके, घोषणा देऊन जोरदारपणे सत्याग्रह केला.
 • कारागृह : येरवडा कारागृह, पुणे.
 • कालावधी : अडीच महिने. (११ डिसेंबर, १९७५ ते २८ फेब्रुवारी, १९७६.)
 • आठवणी : कारागृहात निरनिराळ्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या सत्याग्रहातून व मिसाबंदीतून आलेल्या होत्या. एकूण अंदाजे १५० महिला होत्या. त्यामध्ये ३५ युवती होत्या. ध्वज न लावता मी, माझी आई, व मावशी शाखा भरवून व्यायाम, गीते, रामरक्षा म्हणणे असे घेत होतो. निरनिराळ्या संघटना, राजकीय पक्षांची माहिती देणे, गरबा नृत्य करणे, संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू व कार्यक्रम केले. तरुण कार्यकर्त्या असल्याने दंगाही भरपूर केला. व अभ्यासही केला. सौ. प्रमिला दंडवते यांनी मी व माझी मैत्रीण यांचा इंग्रजीचा अभ्यास घेतला. सौ. भट यांनी योगासने शिकवली. अतिशय अविस्मरणीय अनुभव घ्यायला मिळाला.