कु. गोखले मेधा कृष्ण.

 • नाव : कु. गोखले मेधा कृष्ण. (श्रीमती लिमये अनुपमा सुरेश)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
 • सत्याग्रहाची तारीख : ११ डिसेंबर.
 • जबाबदारी : कार्यकर्ती.
 • स्फूर्तीस्थान : मा. अनिरुद्ध देशपांडे सर.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : वरिष्ठ सरकारी नोकरीत, त्यामुळे घरून प्रचंड विरोध. त्यात वय वर्षे १७ पूर्ण म्हणून सज्ञान नाही. अशा परिस्थितीत कॉलेजमधे घोषणा पत्रके वाटून सत्याग्रह केला. कोणालाही कळून येऊ नये म्हणून घोषणा पत्रके वर्तमानपत्राच्या आत लपवून फलकावर चिकटवली. ठराविक वेळेस वरचे वर्तमानपत्र फाडून आतील मजकूर (सरकार विरोधी) विद्यार्थ्यांसमोर आला. आणि मोठाच कल्ला झाला.
 • कारागृह : येरवडा जेल. (महिलांचे)
 • कालावधी : अडीच महिने.
 • आठवणी : बाहेर सर्व बंदी असताना आम्ही जेलच्या भिंतीआड बिनधास्त शाखा भरवत असू. प्रार्थना म्हणत असू. दररोज मिसा असणाऱ्या सर्व वरिष्ठ महिलांचे बौद्धिक, सामजिक, वैचारिक, व भावनिक दृष्ट्या, आयुष्यातील सोन्याचे दिवस होते.