कुलकर्णी अरुण शिवाजी

कुलकर्णी अरुण शिवाजी
 • नाव : कुलकर्णी अरुण शिवाजी.(Mr. Kulkarni Arun Shivaji)
 • जन्मतारीख : २५ मार्च, १९४८.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर, ७५ ते १९ फेब्रुवारी ७६
 • जबाबदारी : मंडळ प्रमुख, कोथरूड.
 • स्फूर्तीस्थान : प.पू. डॉ. हेडगेवार, प.पू. श्री. गोळवलकर गुरुजी.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : आणीबाणी विरोधात निषेध म्हणून अंदाजे १५ जणांनी सावरकर स्मारक ते एस.एन.डी.टी. पर्यंत पत्रके वाटत व घोषणा देत आम्ही गेलो. त्याचे नेतृत्व मी केले होते.
 • कारागृह : येरवडा मध्यवर्ती कारागृह.
 • कालावधी : २ महिने १५ दिवस.
 • स्फूर्तीदायक आठवणी : येरवडा जेल पूर्ण भरल्यानंतर शिक्षा झालेल्यांना विसापूर जेलमध्ये नेण्यासाठी ८०/९० सत्याग्रहीना मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास बाहेर काढले. परंतु प्रांत संघचालक मा. बाबाराव भिडे यांनी जेलरवर कायदेशीर आक्षेप घेतला. त्याचवेळी सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरसही त्या ठिकाणी आले. त्यांनी स्वयंसेवकांना ४ ते ५ मिनिटे संबोधन केले. ते म्हणाले, ‘ही लढाई संयमाची आहे. ज्याचा दम जास्त तो जिंकणार आहे.’ लवकरच सरकारला आणीबाणी रद्द करावी लागेल. लोकशाही मार्गाने निवडणुका जाहीर कराव्या लागतील. व्यवस्थेसाठी जर ही गोष्ट होत आहे. तर आपण सहकार्य करावे. शेवटी जेलरने सर्वांना सकाळी ७ वाजता पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी ‘भारत माता कि जय’ अशा घोषणा दिल्या.