किवळकर उल्हास नीलकंठ

किवळकर उल्हास नीलकंठ
 • नाव : किवळकर उल्हास नीलकंठ.(Mr. Kivalkar Ulhas Nilkanth)
 • जन्मतारीख : १ सप्टेंबर, १९५४.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : unkiwalkar@gmail.com    
 • सत्याग्रहाची तारीख : दि. २१ डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : स्वयंसेवक.
 • स्फूर्तीस्थान : रा.स्व.संघाचे असंख्य प्रचारक.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : दि. २१ डिसेंबर १९७५ रोजी सायंकाळी ५ वाजता कै. बापूराव धारप (शिवाजी मंदिर – प्रभात शाखेचे जेष्ठ स्वयंसेवक) वय वर्षे ८० यांच्या नेतृत्वाखाली आम्ही १०-१२ स्वयंसेवक उंबऱ्या गणपती चौकात जमलो. तेथून घोषणा देत आम्ही लक्ष्मी रोडने अलका टॉकीजच्या दिशेने निघालो. विजय टॉकीज चौकात आम्हाला अटक करण्यात आली. आमच्या मागे ५०-१०० जणांचा जनसमुदाय होता. कै. वामन परांजपे हे अपंग स्वयंसेवक आमच्याबरोबर होते. त्यादिवशी संध्याकाळी आम्हाला विश्रामबाग पोलीस ठाण्यात नेले. त्यावेळी ते विश्रामबाग पोस्ट ऑफिसच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर होते. दुसऱ्या दिवशी (दि.२२ डिसेंबर रोजी) आम्हाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. व तेथून येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
 • कारागृह : येरवडा व विसापूर
 • कालावधी : दीड महिना २१ डिसेंबर १९७५ ते ४ फेब्रुवारी १९७६.
 • आठवणी : आमच्या तुकडीचे नेतृत्व कै. बापूराव धारप यांनी केले होते. त्यावेळी त्यांचे वय बरेच होते. तसेच कै. वामनराव परांजपे हे अपंग स्वयंसेवक आमच्या तुकडीत होते. परंतु त्या दोघांचा उत्साह आम्हा तरुणांना लाजवेल असा होता. कारागृहात शारीरिक व बौद्धिक कार्यक्रम यांची रेलचेल होती. अनेक उत्साहवर्धक निवेदने रोज होत होती. त्यामुळे शिक्षेचा कालावधी (दीड महिना) कसा संपला ते कळलेही नाही.