कालगांवकर दत्तात्रय मारुती

कालगांवकर दत्तात्रय मारुती
 • नाव : कालगांवकर दत्तात्रय मारुती.(Mr. Kalgaonkar Dattatray Maruti)
 • जन्मतारीख : १ जून, १९४२.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 • सत्याग्रहाची तारीख : नोहेंबर १९७६
 • जबाबदारी : जिल्हा कार्यवाहक – सातारा जिल्हा.
 • स्फूर्तीस्थान : कै. दत्तोपंत म्हसकर, कै. रामभाऊ गानू.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : आणीबाणी पूर्वी माझ्याकडे जिल्हा बौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी होती. आणीबाणीत जिल्हा कार्यवाहक कै. रामभाऊ गानू यांना मिसाखाली अटक झाली. त्यानंतर माझेकडे जिल्हा कार्यवाहक पदाची जबाबदारी आली. आणीबाणीत सर्व कार्यक्रमाचे नियोजन कार्यकर्त्याच्या योजना इत्यादी साठी जिल्हाभर प्रवास झाला. सत्याग्रह पर्वानंतर तरुण कार्यकर्त्यांचा एक वर्ग साताराजवळ कुसवडे गावी योजला होता. त्या वर्गात जिल्हाप्रचारक कै. मधुकरराव जोशी यांच्यासमवेत मी असताना भारत संरक्षण कायद्याखाली आम्हाला अटक झाली.  
 • कारागृह : सातारा जिल्हा कारागृह.
 • कालावधी : दोन महिने
 • आठवणी : १) आणीबाणीत बाहेर भीतीचे वातावरण असले तरी सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य होते. अनेक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने त्यावेळी आणीबाणी विरोधी पत्रके छापणे, ती वितरीत करणे, यात सहभाग घेत. अनेक सामान्य कुटुंबात गृह्बैठकीसाठी जागा, भूमिगत कार्यकर्त्यांना निवास, भोजन व्यवस्था होऊ शकत होती. मिसाखाली कारागृहात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत गोळा होत होती. अनेक वकील सत्याग्रहींसाठी कोर्टात कायदेशीर मदत करत होते.