कापरे माधव मारुती

कापरे माधव मारुती
 • नाव : कापरे माधव मारुती.(Mr. Kapare Madhav Maruti)
 • जन्मतारीख : २५ सप्टेंबर, १९५७.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • ई-मेल : madhav.karpe25@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : ११ डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : स्वयंसेवक.
 • स्फूर्तीस्थान : स्व. भाऊ म्हाळगी व कै. शरदभाऊ साठे, व कै. विजयराव कापरे.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : दत्त मंदिर चौकात दु. ४ वा. आम्ही ११ स्वयंसेवकांनी घोषणा देत सत्याग्रह केला. जवळपास अर्धा तास तेथील वाहतूक थांबली होती. नंतर पोलिसांनी आम्हाला विश्रामबाग येथील पोलीस ठाण्यात नेले. दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले. तेव्हा आम्हाला १ महिन्याची साधी कैद व १००० रु. दंड न भरल्यास १५ दिवस कैद असे एकूण दीड महिन्याची शिक्षा झाली. सुरुवातीला मी ८ दिवस येरवडा कारागृहात व नंतर सव्वा महिना विसापूर जिल्हा कारागृह येथे होतो.
 • कारागृह : येरवडा कारागृह व विसापूर कारागृह.
 • कालावधी : दीड महिना, ११ दिसें. ७५ ते २४ जाने, ७६.
 • आठवणी : येरवडा येथे असताना अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या. प.पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची तेथे भेट झाली. विसापुरला रोज सकाळ-संध्याकाळ विविध स्तोत्रे, पद्ये म्हणणे, मैदानावर शाखा भरवून एक तास विविध खेळ व संघ प्रार्थना असे कार्यक्रम आम्ही करत होतो. त्याच कालावधीत मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यावेळेस पुण्याहून तिळगुळाच्या पोळ्या आल्या होत्या. खूप आनंदात उत्साहात हा काळ आम्ही घालवला.