एक तरी ओवी अनुभवावी - भालचंद्र कुलकर्णी
॥ श्री ॥
एक तरी ओवेवी अनुभुभवावी.....
श्री संत ज्ञानेश्वर
खरं तर आयुष्य खुप लहान आहे आणि ‘अनुभव’ हाच गुरू असल्याने त्याला
महत्त्व दिल्यास संत ज्ञानेश्वरांनी सांगतिल्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी.
आयुष्यात जन्माला आल्यावर माणूस कोठून आला? काय करतो आणि कुठे
जाणार हे परमेश्वराशिवाय कोणालाच सांगता येणार नाही.
आम्ही शाळेतून नुकतेच मिसुरडे फुटलेली कोवळी मुले जेंव्हा देशाचा विचार
करायला लागलो. त्यावेळी पतितपावन सारख्या एका संघटनेचे सभासद झालो आणि
होणार्या साप्ताहिक बैठकीत जाऊ लागलो. त्यावेळी कै.श्री.भिमराव बडदे, श्री.प्रदिप रावत,
डॉ. देवधर यांच्या सारख्या व्यक्ती संपर्कात आल्या.
खरं तर कै.श्री.राजनारायण यांनी कै.श्रीमती इंदिरा गांधी यांना निवडणुक
निकालासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टात पराभूत केले. त्या निर्णयाविरूद्ध कै.श्रीमती इंदिरा
गांधी सर्वोच्च न्यायालयात गेल्या त्यावेळी जस्टीस श्रीकृष्ण अय्यर यांच्यापुढे निकालाला
स्थगिती देण्याचा प्रश्न आला आणि श्रीमती इंदिरा गांधी यांना कायदेशीर अडचण आली
म्हणूनच जून 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली गेली.
जून 1975 ला आणीबाणी लागू झाली होती तो अत्यंत वाईट काळ होता. घटनेने
दिलेले सर्व स्वातंत्र्य नष्ट झाले आणि एका रात्रीत सर्व विरोधकांना गजाआड केले.
वर्तमानपत्राचे अग्रलेख कोरे दिसू लागले व आणीबाणीला प्रखर विरोध झाला.
सर्व पक्षाचे (काँग्रेस सोडून) सर्व कार्यकर्ते आणिबाणीला विरोध करत होते.
त्यावेळी 20 डिसेंबर 1975 रोजी श्री.प्रदीप रावत यांच्या सांगण्याप्रमाणे जंगली महाराज
रस्त्यावर एकूण 13 जणांनी कै.श्री.संभाजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली घोषणा दिल्या.
आम्हाला पोलिसांनी पकडले. त्यावेळी 1) श्री.विवेक देव, 2) श्री.शिरीष श्रीराम
कुलकर्णी, 3) राजन गोरे, 4) श्रीधर आडकर, 5) कांतीलाल बोरा, 6) दिलीप देव, 7)
राजेंद्र आडकर, 8) अरविंद नारके, 9) गौतम भालेराव, 10) अनिल वर्तक, 11) संजय
भावे, 12) संभाजी भुजबळ व मी स्वतः ‘आणीबाणी रद्द करा’ ‘लोकशाही मुल्यांची
जोपासना करा’ ‘व्यक्ती स्वातंत्र्य अबाध ठेवा’ वगैरे घोषणा दिल्या मात्र तेंव्हा ‘इंदिरा गांधी
मुर्दाबाद’ ही घोषणा आम्ही दिली नाही.
सकाळी 10.30 वाजता सत्यागृह सुरू झाला. आम्ही घरात न सांगता सत्यागृह
केला होता. तेथून आम्हाला डेक्कम जिमखाना पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्यानंतर पुणे
येथील जिल्हा न्यायालय कोर्ट आवारातील स्मॉल कॉज बिल्डींगमध्ये जज्ज श्रीमती कदम
पांडे यांच्या समोर उभे केले. मॅजीस्ट्रेट कस्टडी दिली आणि आमची रवानगी पुणे येथील
येरवडा मध्यवर्ती कारागृहात केली गेली.
दर तारखेला आम्हा सत्याग्रहींना पुणे येथील कोर्टात आणत होते. मी जेंव्हा
जेलमध्ये होतो तेंव्हा माझे वडील कै.श्री.वसंतराव दामोदर कुलकर्णी व माझी मोठी बहीण
सौ.मंगलाताई उर्फ विद्या चंद्रशेखर नळोले मला भेटायला आले. मी खुप रडलो माझे
वडील म्हणाले, ‘माझे 1948 सालचे स्वप्न तू पूर्ण केले.’ सन 1948 साली
रा.स्व.संघावर बंदी आल्यावर माझे वडील सुद्धा सत्याग्रह करणार होते. मात्र त्यांना
घरातील वडीलधारी मंडळींनी नकार दिला.
श्रीमती इंदिरा गांधी यांनी सर्व विरोधी पक्षातील लोकांना एकाच दावणीला बांधले.
त्यांच्यात आचार विचारांचे आदान प्रदान होत होते. त्यामुळे आम्हाला सुद्धा तुरूंगात
कै.श्री.बाबा भिडे, कै.श्री.भाई वैद्य, कै.श्री.ना.ग. गोरी, कै.श्री.मोहन धारीया वगैरे थोर
मंडळींची व्याख्याने ऐकायला मिळाली. त्यातील लक्षात राहणारे व्याख्यान
श्री.आप्पासाहेब कासार यांचे होते. त्यांनी दुपारी 4-6 या वेळात 3 दिवस आम्हाला
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व अनुभव सांगितले कारण श्री.आप्पा कासार हे त्यांचे
वैयक्तिक स्वीय सहाय्यक होते. आम्ही जेलमध्ये असताना कुठेही जात, धर्म यांचे बाबत
भेदभाव नव्हते. वैयक्तिक स्वार्थ कुणालाच नव्हता आणि येथे फक्त देश प्रे जाणवत
होते. मा.खासदार श्री.अनिल शितोळे, श्री.प्रकाश जावडेकर, श्री.गोपीनाथ मुंढे वगैरे
मंडळी भेटली पण घरातून सक्त ताकीद असल्यामुळे आम्ही पुढे राजकारणात सक्रीय
झालो नाही. माझी आई कै.श्रीमती सु ती वसंत कुलकर्णी मला पाहण्यासाठी जेलमध्ये
अथवा कोर्टात आली नव्हती कारण तिला वाटल मला बेड्या घातल्या असतील, मला
मारले असेल. तसेच माझ्या आईचा सख्खा भाऊ कै.श्री.महावीर बलभीम इनामदार उर्फ
‘बाबू मामा’ याला मी जेलमध्ये जाऊ का? असे विचारले तेंव्हा त्याने स्पष्ट शब्दात नकार
दिला व तु जर जेलमध्ये गेलास तर मी तुझ्याशी आयुष्य भर बोलणार नाही आणि
शेवटपर्यंत त्यांने तो शब्द खरा केला. माझा मामा दि.18/12/1977 रोजी मयत होईपर्यंत
कधीच माझ्याशी बोलला नाही तो ब्रह्मचारी होता व त्याहीपेक्षा समाजाला घाबरत होता.
तो नैतीकता न सोडता पूर्ण आयुष्य एका नैतिक विचाराने वागला.
खरं तर येरवडा कारागृहात आम्हा राजकीय कैद्यांना कधीही कोणताही त्रास झाला
नाही, भरपूर पुस्तके वाचायला मिळाली, विद्वान लोकांचे विचार एैकायला मिळाले. रोज
सकाळी आम्ही गरमागरम ‘कांजी’ची आतुरतेने वाट पाहत असू. गरीबी व गुन्हेगार यांच्या
मध्ये असणारे आचार विचार कळाले आणि श्रीमती इंदिरा गांधी एक प्रखर विरोधी पक्ष
निर्माण करण्यास कारणीभूत झाल्या.
श्रीमती इंदिरा या खूप चांगल्या होत्या. त्यांची मैत्रीण पपुल जयकर यांनी लिहिलेले
‘टू फेसेस ऑफ इंदिरा गांधी’ हे पुस्तक वाचल्यावर व श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावरील
अनेक पुस्तके वाचल्यानंतर त्या धडाडीची निर्णयक्षमता असणार्या आणि दरारा निर्माण
करणार्या अति उच्च व्यक्ती होत्या, यात कोणताही संदेह नाही.
मी येरवडा कारागृहात असताना कुविख्यात गुंड फिरोज दारूवाला यांना फाशी
देण्याचा प्रसंग आजही आठवतो. त्यावेळी आमच्या बराकीतील वॉर्डन श्री.दादा कुलकर्णी
हे प्रमुख असल्याने त्यांची नियुक्ती गीता पठणासाठी होती आणि फिरोज दारूवालाला
यांच्यासोबत फाशी देण्याच्या आदल्या दिवशी राहण्याचा प्रसंग आला. फाशी देताना
माणूस कसा कळवळतो आणि गुन्ह्याला फाशी का देऊ नये यावर त्यांचे भाषण आजही
स्मरणात आहे.
असो, मात्र त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे त्या वेळेचा जनता पक्ष काही वैचारिक
नितीमत्ता असलेला होता. त्यानंतर कै.श्री.अटल बिहारी वाजपेयी यांचे केंद्रातील सरकार
एका मताने पडले. मात्र सध्या सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या राजकारणातील उड्या,
कोलांट्या उड्या नितीमत्ता संपली आहे असेच दिसत आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील आणखी एक लक्षात राहणारा पाहता प्रसंग म्हणजे
सकाळी व संध्याकाळी केला जाणारा व्यायाम करायचा. आमच्यातील श्री.संजय भावे हे
खुपच छान व्यायाम करायचे आणि त्यांचे बरोबर हाथ न उचलता एका दमात 500
(पाचशे) जोर मारण्याची शर्यत लागली मी ती शर्यत जिद्दीने जिंकली होती. त्याचे बक्षीस
एका बिस्कीटाचा पुडा होता.
सदर मे.कोर्टात आम्हाला गप्प राहण्याचे आदेश होते. मात्र मे.श्रीमती कदम पांडे
या जज्ज बाईंनी विचारले की, कोणाला युक्तीवाद करायचा आहे का? त्यावर मी 19
वर्षाचा असताना हात वर केला व त्यावेळी 10 मिनीटे वक्तृत्व करून सर्वांत कमी शिक्षा
आमच्या बॅचला घेतली. तेंव्हा मी ठासून सांगितले की, आम्ही ‘इंदिरा गांधी मुर्दाबाद’ असे
म्हणालो नाही मात्र घोषणा दिल्या व सत्यासाठी सत्याग्रह केला. तेंव्हापासून कोर्टात भाषण
करण्याची भिती, दडपण निघून गेले व त्यानंतर आयुष्यभर कोर्टात युक्तीवाद व
उलटतपासण्या घेण्याचा चांगला अनुभव आजतागायत घेत आहे. प्रारब्ध आणि
प्राक्तनाच्या अंगणात सत्याचे संस्कार कधीच विरक्त होत नाहीत हेच खरे. त्यामुळे त्याची
नक्कल केली जाऊ शकते, कॉपी मात्र नाही.
खरं तर जेलमध्ये जाणे हे चुकीचे, अत्यंत अयोग्य असून नीतीमत्ता संपलेले असते.
मात्र भारत भू ीसाठी, भारत मातेसाठी आम्ही जेलमध्ये गेलो होते हे सांगणे देखील अयोग्य
वाटते. कारण मातेची सेवा व देशाची सेवा केली तर ती सांगायची नसते मात्र ती प्रत्यक्ष
अनुभवावीच लागते म्हणूनच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे श्रीसंत ज्ञानेश्वरांनी जे
सांगितले, त्याप्रमाणे ही गोष्ट सांगण्यासाठी नव्हे तर स्वानुभवण्यासारखी आहे.
‘‘भारत माता की जय, हिंदु राष्ट्र की जय’’
अॅड.भालचंद्र उर्फ आनंद वसंत कुलकर्णी
108, नारायण पेठ,
सु ती अपार्ट ेंट, पुणे-30
मो.9422315294