आम्ही सत्याग्रही -  श्री पांडुरंग गवई 

श्री पांडुरंग शामरावगवई

तेहतीस क्रांती सोसायटी सत्याग्रही

देशांमध्ये १९७५ साली आणिबाणीचे प्रवास सुरू झाला त्यास आता त्रेचाळीस वर्षे झाली .त्या वेळच्या पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनेची पायमल्ली केली लोकशाहीतील स्वातंत्र्याची गळचेपी केली भाषण स्वातंत्र्य ,लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील चौथा समास समजला जातो त्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा घाला घातला. आणीबाणी देशात लागू केली।

  • त्यासाठी लोकशाहीचे रक्षण करण्याकरिता देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.विद्यार्थी परिष,विश्व हिंदू, परिषद भारतीय मजदूर संघ आणि इतर लोकशाही मांडणाऱ्या श्रीमती संघटनांनी आणीबाणी विरोधी आंदोलन सुरू केले ‘सत्याग्रह ‘ हा त्यातील एक आणीबाणी विरोधासाठी उपाय .वरील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रह पर्व सुरू केल. सर्व राज्यातील कार्यकर्त्यांनी आणीबाणीविरोधी कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे त्यांना अटक केल.
  • एकोणीसशे पंचाहत्तर साली विद्यार्थी परिषदेचे कार्य करीत होतो एक जबाबदार नागरिक या नात्याने मी सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतला.१९७६ जानेवारी महिन्यात आम्ही ६ सत्याग्रहींनी सुभाष चौक सोलापूर येथे संध्याकाळी आणि बाणी विरोधी घोषणा दिल्या .म्हणून आम्हा सर्वांना अटक करण्यात आली
  • तुरुंगात असताना आमचे सकाळचे दैनंदिन कार्यक्रम सुरू झाले तिथे संघाचे प्राप्त:स्मरण, योग, व्यायाम ,आसने प्रार्थना असे उपक्रम चालू झाले. दुपारच्यावेळी ग्रंथवाचन. वृत्तपत्रे वाचण्यात  येत असेल.
  • आमच्या बॅचमध्ये श्रीराम तळवलकर, शरद पांडुरंग ,गवळी प्रकाश अकलूजकर, मदन घोरपडे प्रकाश माणकेश्वर यशवंत लेले हे सत्याग्रही होते. त्याच दिवशी सोलापूर येथील जेल रोड तुरुंगात ठेवले गेले. त्यानंतरही बऱ्याच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून आमच्या शेवटच्या तारखेला न्यायालयाने आम्हाला तीन कलमाखाली अटक केली. म्हणून तीन महिन्यांची शिक्षा झाली. ती शिक्षा एकाच माहिनयात भोगले म्हनुन. न्यायालयाने दिनांक ११/०२/१९७६ रोजी आमची तुरुंगातून सुटका केली .

माझे घर जेल रोड हे  कारागृहाजवळ असल्याने अधूनमधून मला जेवणास डबा येत असे परंतु तो डबा मला मिळत नसे .जेवणाचा डबा आमचेच कार्यकर्ते फस्त करीत. अशी आमची तुरुंगात असताना गंमत होती. खेळी, मेळीचे स्नेहाचे वातावरण तुरुंगात होते. त्यांचे आठवण अजूनही येथे. कालांतर नेता वस्त्या वेळच्या सरकारने अध्यादेश काढून अनवाणी रद्द केली.हा एक प्रकारचा लोकशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय होता.

satyagrahi1975@gmail.com