आणीबाणी आणि आठवणी - हेमंत कुलकर्णी

नांव: हेमंत दामोदर तथा बाळ कुलकर्णी

पत्ता: ४९५, नारायण पेठ, पत्र्या मारुती जवळ, पुणे-४११०३०

व्यवसाय: बांधकाम

सत्याग्रहाविषयी : दिनांक १९ नोव्हेंबर १९७५.

                        संघाची पहिली बॅच.

                        बॅच लीडर म्हणून जबाबदारी.

स्थान:.              आपला बळवंत चौक.

सहभागी:. जयंत म्हाळगी, चर्होलीकर ज़ोशीबुवा, रवी कुलकर्णी, दादा गोळे, निळू जोशी, रवी जोशी.

शिक्षा: कोर्ट नं.४.   १५ दिवस. येरवडा जेल. ३ डिसेंबरला सुटका. संध्याकाळी लगेच मिसाखाली अटक. रात्री नाशिकला रवाना.

दि. ४ डिसेंबर १९७५ ते १ जून १९७६ NRCPमध्ये 

वास्तव्य. १ जून १९७६ रोजी सुटका.

विशेष: मा.श्री.पंत फडके, श्री.मधु जोशी, मामा हळबे व श्री.तात्या घाटपांडे हे आठवडाभर अगोदर एक दिवस रात्रीच्या वेळी घरी आले.'पुढच्या आठवड्यात तुम्हाला शिबिरात जायचे आहे. तेव्हा तयार रहा.इतर तपशील योग्य वेळेला कळेल.एवढं सांगून थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन निघून गेले.

आदल्या दिवशी रात्री सर्व तपशील समजला पण घरी काहींच कल्पना दिली नाही. जायला घरून विरोध व्हायला नको हा हेतू.

दुसर्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे कामावर गेलो.कामावरही कोणाला कल्पना दिली नाही.दुपारी एक वाजता जेवायला घरी आलो. जेवण केलं व त्यानंतर सौ.ला सांगतले.सुरवातीला ती थोडीशीच गडबडली पण लगेच सावरली. कारण विचार करायला वेळच कुठे होता? संत्याग्रहाची वेळ दुपारी दोनची ठरली होती.थोड्याच वेळात बाकी सगळेजण येणार होते.

१५-२० मिनिटातच सर्व जण जमा झाले.निघणार तोच सौ.नं सर्वांना दोन मिनिटे बसायला सांगितले.पटकन तिने ओवाळण्याची तयारी केली. आम्हा सातहीजणंना कुंकू लाऊन ओवाळले. सर्वांच्या हातावर गुळाचा प्रल्हाद ठेवला. आणि आम्हाला निरोप दिला. त्यावेळी ती एकटी घरी.सोबत माझ्या दोन मुली.एक वय वर्षै दोन व दुसरी एक वर्षाची.थोरली गोरी, धाकटी धनिका. सौ.चा भाऊ प्रा.राघव अष्टेकर हा भूमिगत. कोणाचाही आधार नाही. पण तिने धीराने दिवस निभावले. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या साहेबांनी,  R.S.Sanghavi, माझ्या घरी दरमहा माझा निर्माण पगार घरी पोचता केला. तसे ते कांहीं संघविचाराचे होते वगैरे असं काही नाही.

दुसरं एक विशेष म्हणजे त्या काळात सरकारी नोकरीत असणारी मंडळी संबंध ठेवत नसत.

त्याप्रमाणे माझा एक मित्र दुरावला पण दुसरा एक मित्र मात्र मुद्दाम जेलमधे भेटायला आला.

जेलमध्ये मी बरॅक ५ मधे होतो. माझ्याकडे भोजन विभागाची जबाबदारी होती. गिरीश बापट मला तेव्हां अन्नमंत्री म्हणायचे. गमतीने. पण २०१५ मधे एकदा ते आमच्याकडे पुणे मराठी ग्रंथालयात 

एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली.तुम्ही तेव्हां मला गमतीने अन्नमंत्री म्हणत असत आणि आता ततुम्ही स्वत: राज्याचे खरेखुरे अन्नमंत्री झाला आहात.तुमचं अभिनंदन.त्यांना खरंच खूप आनंद झाला. जेलमध्ये अनेक मोठ्यामोठ्या लोकांचा सहवास लाभला.शरदराव हेब्बाळकरांकडून हिंदूंचा इतिहास, प्रमोद महाजनांना डून भाषणाला,दातेंकडून पंचांग, मुंबई चर्या माधवरांवकडून योग असं बरंच काही.तो काळ अविस्मरणीय. एवढं नक्की.

- satyagrahi1975@gmail.com