आणिबाणी आठवणी-५ - सुनील दळवी

नियोजनाप्रमाणे सत्याग्रह होत होते. ठरल्या प्रमाणे तुकड्या सत्याग्रह करत होत्या. त्यामुळे तुरुंगात सत्याग्रहींची संख्या वाढु लागली. त्यामुळे तुरुंगात जागेचा प्रश्न निर्माण झाला असावा. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने काही सत्याग्रहींना विसापूजेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्यकेसचा निकाल लागुन शिक्षा झाली आहे अशांना विसापुरला पाठवण्याचे ठरले. ज्यांना पाठवायचे आहे अशांची एक  बैठक झाली. 
‌ही बैठक मिसा मधील कोणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी घेतली. त्यांनी विषय समजुतीच्या सुरात मांडला ज्यायोगे कुणीही धीर सोडणार नाही. त्या बैठकीला कै.मा.बाबा भिडे उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलेले आम्ही पाहिले
‌ आहे. नंतर दोन तीन दिवसात आमची रवानगी विसापुरला झाली. पोलीस व्ह्यानमधुन बंदोबस्तात पाठवले. तीन चार तासांचा प्रवास. सुरुवातीला काही वाटले नाही पण नंतर नंतर  कंटाळा आला. मग बसल्या बसल्या आमच्या टिवल्याबावल्या सुरू झाल्या. काही जणांना सिगरेट  लागत होती. त्यांच्या कडे सिगरेटी  सुद्धा होत्या पण काटे पेटी  कुणाकडेच  नव्हती.. ते जरा जास्तच वैतागले  होते. काही वेळाने पोलीस चहा पिण्यासाठी थांबले पण जाताना आम्हाला दम देउन  गेले की कोणी अजिबात गडबड  करायची नाही नाही तर कानाखाली जाळ काढीन .. सिगरेट न मिळाल्याने काही जण वैतागलेल्या होते, जाळ काढीन म्हणाल्यावर कोणीतरी बडबड ला अरे सिगरेट पेटवून घ्हाया रे पटकन. त्यावर सगळे जण मोठ्याने हासले. त्यामुळे   ना तो हवालदार अधिक भडकला आणि त्यानें आणखी मोठ्या आवाजात दम दिला. नशीब त्यानें फक्त  दमच दिला. कोणाच्या कानाखाली जाळ काढला नाही. 
‌विसापूर हा सक्त मजुरी च्या शिक्षेसाठी प्रसिद्ध. त्या जेलला येरवड्यासारख्या उंच भिंती नव्हत्या तर तारेचे कुंपण होते. एका गोल मैदानाच्या भोवती लहान लहान बराकी होत्या. जेवायला भाजी भाकरी असायची. आतापर्यंत येरवड्यातील बावनपत्तीची सवय झाली होती तेव्हड्यात इकडे आलो. इथल्या भाजीचा पत्ताच लागत नव्हता. ५६पत्ती६०पत्ती नेमकी कोणती भाजी आहे तेच कळत नव्हते. मधल्या मैदाना भोवती सूर्यफुलाची झाडे होती. एक दिवस ती सगळी साफ झाली. ही झाडे का काढून टाकली असा विचार मनात आला. पण दोन दिवसांनीं जेवताना भाजीत आख्खी सूर्य फुलांची पाने आली. 
‌पण त्या दिवसांत फक्त एकदाच निराशेचा क्षण आला. त्या मैदानातील एका खांबांवर  एक स्पीकर लावला होता आणि  त्यावर आकाश वाणी च्या बातम्या लावत असत. त्यावेळी आचार्य विनोबा भावे एक वर्ष भर मौनात होते. आणि २५डिसेंबरला मौन सोडणार होते. ते आणिबाणी बद्दल काय प्रतिक्रिया देतात याबद्दल उत्सुकता होती आणि थोडीशी आशा पण होती. त्यावेळी त्यांनी आणिबाणी चे वर्णन अनुशासन पर्व असे केले त्या मुळे खूप निराश झलो होतो. पण नंतर काही दिवसांनी कळले विनोबाजी तस काही बोलले नव्हते तो सगळ अपप्रचार होता कारण ऑल इंडिया रेडियो हा ऑल इंदिरा रेडियो झाला होता.

-सुनील दळवी