मंतरलेले दिवस -डॉ. अनिल प्रभाकर कुलकर्णी, पुणे.
२५ जूनला आणीबाणी जाहीर झाली व नंतर अभाविप कार्यकऱत्यांनी सत्याग्रहाची योजना आखली. एकाच वेळेस १० कॉलेजवर १०० कार्यकर्त्यानी सत्याग्रह करावा अशी योजना केली. त्यात गरवारे कॉलेजवर माझ्या बरोबर ७ जण सत्याग्रहात सामील झाले. ११ डिसेंबर १९७५ रोजी आम्हाला अटक करून येरवडा जेलमध्ये नेण्यात आले. एकाच दिवशी १० कॉलेजवर सुमारे १०० जण सत्याग्रह करून जेलमध्ये आले. तिथे आधीच २०० जण होते. आम्ही आत गेल्यावर त्यांना खूपच उत्साह आला. मिसामधील नेत्याना आनंद झाला. मग काय आमचे ३०० जणांचे शिबिरच जेलमध्ये सुरु झाले.