अनुभव

प्रकाश देव यांचे अनुभव

ही खरेच सत्त्वपरीक्षा ! या आंदोलनात जे तुरुंगात होते त्यापेक्षा बाहेर असलेल्यांचे योगदान मोठे होते. आम्ही मिसबंदी तुरुंगात असूनही मुक्त होतो, निर्धास्त होतो आणि बाहेरील प्रत्येक जण तणावात होता. त्यांच्या अविरत कष्टा शिवाय पुढील यश अशक्य होते. त्या सर्वांचे हे ऋण आहे. त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना सादर प्रणाम!

आणीबाणी आठवणी - सुनील दळवी

१९७५ साल होते. मी बी एस्सी दुसर्या वर्षाला होतो. त्या वर्षी विद्यापीठातल्या प्राध्यापकांचा अभूतपूर्व संप झाला होता. त्यामुळे सर्व परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यावेळी आमची परीक्षा में अखेर सुरु झाली आणि जुनच्या पहिल्या आठवड्यात संपली. पुण्यात रमणबागेत संघ शिक्षा वर्ग भरला होता, मी वर्गाला जाणे अपेक्षित होते पण मी वर्गात चक्कर सुद्धा मारली नव्हती परीक्षा संपल्यावर मी जेव्हा वर्गात गेलो तेव्हा वासुदेवराव देशपांडेंनी मला चांगलच झापल होत. परीक्षा संपल्यावर सुट्टीच होती माझे काका बडोदा इथे असतात त्यांच्याकडे जायचे आधीच ठरवले होते.

आणीबाणीचा काळ  १९७५ ते १९७६ -  राजन रघुनाथ गंधे

२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीला लाथाडून व कायदा हातात घेऊन देशात आणीबाणी लादली.

कारागृहात अनुभवलेला काळ -- ११ डिसेंबर १९७५  ते २४ जानेवारी १९७६ (पूर्ण  ४५ दिवस.)

आलेला अनुभव आज ४३ वर्षा नंतर शब्द रुपाने आपल्या पुढे मांडत आहे. त्या वेळी आमच्या सगळ्यांची वये  १८ ते २० च्या मधील. हे आणीबाणी प्रकरण फार कोणाला माहिती नव्हते . पण पत्रके नेऊन

जीवन गोपाळ जोशी यांचे अनुभव

आणीबाणी लागून एक  वर्ष पूर्ण झाले तेव्हा काही मोजक्या लोकांना परत 8 दिवसां करता पकडले होते मला अगोदर कुणकुण लागली होती मि पेरूगेट   समोरच्या कट्ट्यावर झोपलो होतो रात्री माझे समोर बापूराव धारप यांना पकडले माझी खात्री झाली आपला नंबर आहे रात्री पोलिस घरी येऊन गेले होते घरी दम देऊन गेले मी सकाळी घरी गेलो घरचे घाबरले होते मला लगेच पोलिसनी बोलविले आहे तू ताबडतोब चौकत जा हजेरी लावून ये घरचे लोक घाबरले होते मी गेलो 8 दिवसांनी घरी आलो

आणीबाणी आठवणी - अनिरुद्ध खोले

आणीबाणीचा काळ अत्यन्त कठीण होता.अनेकांना त्याच्या यातना भोगाव्या लागल्या. झालं गेलं विसरून जा असं कसं म्हणता येईल? ब्रिटिशांच्या काळात किमान सामान्य जनतेची सहानुभूती होती,पण आणीबाणीच्या काळात आपलेच परके झाले होते.अनेक जणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. जवळचे आप्तस्वकीय ओळख दाखवेनासे झाले. दरवाजे बंद होऊ लागले.सगळीकडे अंधारच अंधार.
या सरकारने मानधन देण्याचे ठरवले हे उत्तम झाले. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी जी पापे केली त्यातुन थोडेतरी उतराई होऊ शकेल. बाकी आणीबाणी भयानक होती हे ठसवणे आवश्यक आहे.

 

आणिबाणी आठवणी-५ - सुनील दळवी

नियोजनाप्रमाणे सत्याग्रह होत होते. ठरल्या प्रमाणे तुकड्या सत्याग्रह करत होत्या. त्यामुळे तुरुंगात सत्याग्रहींची संख्या वाढु लागली. त्यामुळे तुरुंगात जागेचा प्रश्न निर्माण झाला असावा. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने काही सत्याग्रहींना विसापूजेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्यकेसचा निकाल लागुन शिक्षा झाली आहे अशांना विसापुरला पाठवण्याचे ठरले. ज्यांना पाठवायचे आहे अशांची एक  बैठक झाली. 

अनुपमा लिमये यांचा अनुभव

मी जेलमधे गेले तेव्हा वय वर्षे १७ होते. म्हणजे १८ पूर्ण नाही. त्यामुळे सज्ञान नाही. म्हणून पोलिसांनी वडिलांना खूपच  त्रास दिला. म्हणजे ते सरकारी नोकरीत होते. वतरीही त्यांनी मुलीला सरकार विरुध्द फितवले, व आंदोलन करायला लावले. हा त्यांच्यावर ठपका ठेवला होता. आजूबाजूला बेईज्जत होईल एव्हढ्या चौकशा केल्या. नोकरी जाईल की काय एव्हढी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा परिणाम म्हणून पुढिल निवडणूक होऊन कॉंग्रेसचे राज्य जाईपर्यंत वडिल माझ्याशी नीट बोलत नव्हते.

आणिबाणी आठवणी-४ - सुनील दळवी

येरवडा जेलमध्ये मिसा बंदी एका वॉर्डमध्ये होते आणि सत्याग्रही एका वॉर्ड मध्ये होते. आमच्या वॉर्डमध्ये सत्याग्रहींशिवाय इतर कोणी कैदी  नव्हते, त्यामुळे तुरुंगात आलो आहोत असे वाटतच नव्हते. नाही म्हणायला शिपाई आणि इतर कैदी यांची ये-जा चालायची त्यामुळे तुरुंगात असल्याची जाणीव व्हायची. आमच्या आधी काही जण सत्याग्रह करून आले होते. त्यात सुरेश नाशिककर होते. दोन चार दिवसांत गिरीष बापट आले. तिथे दिवसाचा कार्यक्रम सेट झाला होता. दुपारी मिसाबंदींपैकी कोणाचा तरी बौद्धिक वर्ग/व्याख्यान होत असे. त्यामध्ये समाज वादी  मंडळी सुद्धा असत. एकंदरीत सर्वांचा टेंपो टिकुन होता. 

आणिबाणी आठवणी-३ -सुनील दळवी 

दसरा झाला, दिवाळी झाली. दिवस जात होते. माझे कॉलेज पण सुरू होते. नोव्हेंबर मध्ये सेमिस्टर परिक्षा होती. त्यामुळे अभ्यासात लक्ष होते. अधुनमधुन बैठकी पण होत होत्या. होता होता आणिबाणी विरोधी लढ्याची योजना पण तयार झाली. आणिबाणी मध्ये घटना धाब्यावर बसवुन लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी केली म्हणून लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचे ठरले. त्याकरता अखिल  भारतीय स्तरावर लोक संघर्ष समिती स्थापन केली. आणि त्या माध्यमातून लढा देण्याचे ठरले. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बुलेटिन काढायला सुरुवात झाली. ही बुलेटिन्स छापण आणि वितरीत करण हे फारच धोकादायक होते.

आणिबाणि आठवणी-२ -सुनील दळवी 

हळुहळू आणिबाणी चा परिणाम जाणवु लागला. लोकांमधे भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले. जनता एका अनामिक दडपणाखाली होती. अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीचा डंका पिटण चालू झाले. पण वास्तवात सरकारी दहशतीचा वरवंटा फिरत होता. काही बोलायची चोरी होती. माझ्या पत्नीचे माहेर कर्नाटकातले. तिच्या आईचे नाव इंदिरा होते. तर त्यांच्या कॉलनीत राहणाऱ्या इतर बायका तिला इंदिरा या नावाने हाक मारायला सुद्धा घाबरत होत्या. इतकी जबरदस्त भिती पसरली होती. 

Pages