अनुभव

एक तरी ओवी अनुभवावी - भालचंद्र कुलकर्णी

॥ श्री ॥

एक तरी ओवेवी अनुभुभवावी.....

श्री संत ज्ञानेश्‍वर

खरं तर आयुष्य खुप लहान आहे आणि ‘अनुभव’ हाच गुरू असल्याने त्याला

महत्त्व दिल्यास संत ज्ञानेश्‍वरांनी सांगतिल्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी.

आयुष्यात जन्माला आल्यावर माणूस कोठून आला? काय करतो आणि कुठे

जाणार हे परमेश्‍वराशिवाय कोणालाच सांगता येणार नाही.

आम्ही शाळेतून नुकतेच मिसुरडे फुटलेली कोवळी मुले जेंव्हा देशाचा विचार

आम्ही सत्याग्रही -  श्री पांडुरंग गवई 

देशांमध्ये १९७५ साली आणिबाणीचे प्रवास सुरू झाला त्यास आता त्रेचाळीस वर्षे झाली .त्या वेळच्या पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनेची पायमल्ली केली लोकशाहीतील स्वातंत्र्याची गळचेपी केली भाषण स्वातंत्र्य ,लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील चौथा समास समजला जातो त्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सुद्धा घाला घातला. आणीबाणी देशात लागू केली।

श्रीराम कुलकर्णी यांचे अनुभव

आणीबाणीच्या आठवणी अनेक कारणांमुळे बरेचदा येत असतात अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे जेवणाचे वेळी कोणी मुले जेवताना सोबत असली आणि कोणी म्हणाले की मला ही भाजी आवडत नाही मी चेष्टेने म्हणतो तुम्हाला 52 पतीची भाजी खायला तरी कंपल्सरी जेलमध्ये ठेवले पाहिजे जाने की भाजी भाजी त्याला जगात कुठेही जगणे अवघड नाही जिभेचे चोचले बंद गोष्ट निघाली म्हणून सांगायचे आत्ताच एक गंमत सांगून टाकतो जेलमधून बाहेर पडताना जेल चे कपडे उतरवून आमचे कपडे परत दिले तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये दोघे असे होते की जो गोलमटोल होता तो इतका बारीक झाला की त्याची पॅंट कमरेवर न राहता खाली गळून पडली, तर एकाला

आणीबाणी आणि आठवणी - हेमंत कुलकर्णी

नांव: हेमंत दामोदर तथा बाळ कुलकर्णी

पत्ता: ४९५, नारायण पेठ, पत्र्या मारुती जवळ, पुणे-४११०३०

व्यवसाय: बांधकाम

सत्याग्रहाविषयी : दिनांक १९ नोव्हेंबर १९७५.

                        संघाची पहिली बॅच.

                        बॅच लीडर म्हणून जबाबदारी.

स्थान:.              आपला बळवंत चौक.

सहभागी:. जयंत म्हाळगी, चर्होलीकर ज़ोशीबुवा, रवी कुलकर्णी, दादा गोळे, निळू जोशी, रवी जोशी.

आणीबाणी 1975 - अनिरुद्ध खोले

पुणे लष्कर भागात संघ शाखा सुरू होऊन 40 वर्षे झाली होती. संघाचे वर्षभरातील उत्सव मोठ्या संख्येने साजरे होत. लष्कर भागात अहिंदू समाज मोठया प्रमाणात असल्यामुळे संघ शाखेचे विशेष महत्व होते. तशातच संघ बंदी आल्यामुळे आम्ही कार्यकर्ते अस्वस्थ झालो होतो. देशभरात होत असलेली धरपकड मनाचा थरकाप उडवून देत असे. कोणाला कधी तुरुंगात डांबले जाईल याची शाश्वती नव्हती. नुसता संशय जरी आला तरी पोलीस पकडून नेत असत. अशातच संघ वर्तुळातून आणीबाणी विरुद्ध सत्याग्रह करायचे ठरले.

आणीबाणी आणि आम्ही मैत्रिणी - सौ. आरती अरविंद शिराळकर

१९७५च्या शालान्त परिक्षा होईपर्यंतचं माझं जग फक्त शाळेपर्यंतच सीमित होतं. मात्र हुजूरपागेसारखी उत्तम शाळा आणि शनिवारपेठेत असलेलं घर या दोन गोष्टींमुळे आमच्या नकळतच समाजातील घडामोडींचे पडसाद आमच्या मनात रुजत असावेत. अधूनमधून अम्रुतेश्वराच्या देवळात भरणाऱ्या समितीमध्ये गेल्यामुळे आसपासच्या समवयस्क मुलींशी तोंडओळख होती. आमच्या वाड्यातही नियमीतपणे संघशाखेवर जाणारे बरेच लोक असल्याने त्यांच्या विर्षिक शिबिरांसाठी शिधा किंवा पोळीभाजी जमा करणं एवढंच काय ते आमचं सामाजिक योगदान वगै. काय म्हणतात ते असायचं.  

 

`ती' काळरात्र!

बरोब्बर ४३ वर्षांपूर्वीची गोष्ट. देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमालीचे अशांततेचे, असंतोषाचे व अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. अलाहाबाद हायकोर्टाने १२ जून १९७५ रोजीच तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातील निवडणूक रद्दबातल ठरवून त्यांची खासदारकी संपुष्टात आणली होती. न्या. जगमोहन सिन्हा यांनी दिलेल्या या निकालाला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले खरे, पण तिथे न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी २४ जून रोजी हाच निकाल कायम ठेवला.

आठवणी आणीबाणीच्या - सौ स्नेहल बिरजे (सुवर्णा कुलकर्णी)

आणीबाणी घोषित झाली तो दिवस मला आजही चांगला आवठवतोआहे. माझे बाबा, त्यावेळचे शिक्षक आमदार श्री. मुकुंदराव कुळकर्णी  राजस्थान च्या दौर्‍यावर होते. सकाळी अनेक जागा रिक्त असणारे वर्तमानपत्र पाहून वाटणारे नवल ओसरायच्या आधीच संघाच्या अनेक नेत्यांना  अटक करून तुरुंगातटाकल्याची बातमी येऊन धडकली. माझी आई सौ.हेमलता कुळकर्णी , जी महात्मा फुले हायस्कूल आदमबाग येथे मुख्याध्यापिका होती , ती शाळेत जायला निघाली असतानाच बाबांचा टंकाॅल आला . त्यांनी आईला सांगितल," संघाच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. मलासुद्धा केंव्हाही अटक होऊ शकते.

आणीबाणी १९७५मधील आठवणी - श्री. सुनिल गोसावी

१९७५ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी आणीबाणी लादली होती. काही वृतपत्रांनी पहिले पान संपूर्ण काळ्या शाई मध्ये छापून निषेध केला.  मी fergusson college  मध्ये होतो. तरुण वयात काळे पाणी इ. वाचले असल्याने आणि संघ स्वयंसेवक असल्याने देशाभिमान जागृत होता. कॉलेज मधील काही  मित्र आणीबाणी विरुद्ध काय काय करता येईल चा विचार करत होतो. त्या काळात श्री पंत फडके college वर येत असत. तसेच श्री शरद कुंटे ह्यांचाशी संपर्क असे,

Pages