देवरस यार्ड

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 साली ‘आणीबाणी’ घोषित केली. सुमारे 19-20 महिने संपूर्ण देशात लोकशाहीविरोधात अनेक अप्रिय घटना घडल्या. सर्व विरोधी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना ‘मिसा’ कायद्याखाली स्थानबद्ध करून तुरुंगात डांबण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्यात आली व संघाचे अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनाही तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या काळी राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय उपाख्य, बाळासाहेब देवरस यांनाही अटक करून पुणे येथील सुप्रसिद्ध अशा ‘येरवडा जेल’ मध्ये ठेवण्यात आले होते.

सौभाग्यवतींचा हातभार

पुणे जिल्हा कार्यवाह - प्रत्यक्ष अटक 21डिसेंबर 1975 ला झाली. तत्पूर्वी भूमिगत म्हणून कार्य केले. त्या वेळचा एक अनुभव. भूमिगत असताना लोणावळे येथे घरच्या मंडंळींना (पत्नी व 2 मुले) भेटीस बोलाविले. पोलिसांना मागोवा लागला. हे ओळखून इनामदार राजमाची पॉईंटकडे गेले. तेथेही पोलिसांचा पाठलाग. वेळ रात्रीची. पाऊस संततधार. रात्री एकदम दिवे गेले. पोलीस मागावर आहेत, हे ओळखताच बोरिवली गाडीने घरच्या मंडळींना तेथेच ठेवून पसार. जागोजागी पेटलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंग ओळखून दुसर्‍याकडून टॅक्सी मागविली व घरच्या मंडळींना योग्य स्थळी पोहोचवले.

बाळासाहेबांचे कारागृहातील दर्शन

दि. ४ जुलै १९७५ ला रात्री एक वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे प्रचंड दरवाजाचे छोटे दिंडीदार माझ्यासाठी उघडले गेले. बरोबर पुणे जिल्हा संघचालक डॉ. केळकर होते, संस्कृतपंडित, एकतेचे संपादक डॉ. वसंतराव राहूरकर होते. जेलयात्रा सुरू झाली होती. आम्ही गेलो तेव्हा सारा तुरुंग झोपला होता. सकाळी पोलिसाने खोलीचे कुलूप काढले. अंधेरी यार्डच्या ओसरीवरून मी इकडे तिकडे पाहिले आणि काय आश्‍चर्य! अंधेरी यार्डमधल्याच एका खोलीतून रा.स्व.संघाचे सरसंचालक बाळासाहेब देवरस बाहेर आलेले मी पाहिले. मी झटकन पुढे गेलो. बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. स्वत:चा परिचय करून दिला.

लोकशाही रक्षणासाठी सत्याग्रह

पुढारीपणाचे फायदे व तोटे या दोन्ही गोष्टींचा अनुभव अलीकडे मला येत आहे. संघात जयजयकार कधी फारसा होत नाही. व्यक्तिशः आपण करूही देत नाही; परंतु सध्या सत्कार, स्वागत समारोह चालू आहेत. गळ्यात हार पडत आहेत. भाषणांतून, लेखांमधून प्रशंसा होत आहे. ‘हे सारे बरे आहे’ असे वाटत नाही, असे काही म्हणावयाचे कारण नाही. परंतु पुढारीपणाचा दुसराही अनुभव आहे. पुढारी पुढे असतो आणि लोक मागे असतात. मागे असलेले लोक त्या पुढार्‍याला असे काही पुढे ढकलत असतात की त्याला मागे फिरणे किंवा इकडे तिकडे वळणे याची शक्यता फारशी नसते.

आणीबाणी

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच मोतीबागेतील संघाचे कार्यालय बंद करण्यासाठी पोलीस आले. पण तसे पाहिले तर तांत्रिकदृष्ट्या हे कार्यालय काही संघाचे नाही. ‘भारतीय संस्कृती संवर्धन संस्था’ यांची ही वास्तू. रीतसर ठराव करून ती संघाला भाड्याने देण्यात आली. तेथे महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय सुरू करण्यात आले. पहिल्या मजल्यावर ‘भारतीय संस्कृती संवर्धन’ संस्थेचे कार्यालय होतेच. तेव्हा ते बंद करायचे म्हणजे नक्की काय करायचे? असा प्रश्‍न पोलिसांपुढे उभा राहिला. शेवटी खाली कुलूप आणि वरचा मजला उघडा ठेवण्यात आला, कारण आणीबाणीत जरी संघावर बंदी असली तरी त्या संस्थेवर काही बंदी नव्हती.